भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणे अंतरिंचा भाव । तोचि करितो उपाव

jane antarincha bhav | tochi karito upav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणे अंतरिंचा भाव । तोचि करितो उपाव ॥१॥ न लगें सांगावें मांगावें । जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें। फळ धीर धरोनि ॥ध्रु.॥ बाळा न मागतां भोजन । माता घाली पाचारून ॥२॥ तुका म्हणे तरी । एकीं लंघियेले गिरी ॥३॥