भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय

janon nenon kay | chittin dharun tujhe pay

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय ॥१॥ आतां हें चि वर्म । गाऊं धरूनियां प्रेम ॥ध्रु.॥ कासया सांडूं मांडूं । भाव हृदयीं च कोंडूं ॥२॥ तुका म्हणे देवा । जन्मोजन्मीं मागें सेवा ॥३॥