भजनी मालिका

भजने

जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥१॥ सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाईच्या वरा पावें वेगीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्मकाळीं देवें प्रतिज्ञा पैं केली । शतकोटी लिहिली काव्यरचना ॥१॥ चौदाजणीं त्यांचे काव्य तें केलें । निरभिमानें वंदिले संतजन ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जन्मजन्मांतरीं झाला तुज श्रम । ह्मणोनियां ब्रह्म आलें येथें ॥१॥ राखतील गाई मारीतील दुष्ट । न करी बोभाट जनामध्यें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जन्मजन्मातरीचें सुकृत जोडणें । संतचरण पावणें तेणें भाग्यें ॥१॥ हा माझा विश्वास संतचरण सेवा । दुजा नाहीं हेवा प्रपंचाचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जन्ममरण कोडें निवारी हा संग । भजें पाडुंरंग आधी ॥१॥ वायांची पसारा नासिलासी सारा । कां रे चुकसी पामरा भजनासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जन्ममरण सांकडें निवारावया कोडें । विठ्ठल उघडें पंढरीये ॥१॥ तयाचे चरणां मिठी घाली मना । नाहीं तुज यातना जन्मकोटी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥१॥ वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय काय ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्ममरणांची विसरलों चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥१॥ होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय आणि भार निरसलीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जन्ममरणाचें तुटलें सांकडें । कैवल्य रोकडें उभें असे ॥१॥ डोळियाचा डॊळा उघड दाविला । संदेह फिटला उरी नुरे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जन्ममरणाचें भय मज दाविसी । तें म्यां ह्रषिकेशी अंगिकारलें ॥१॥ आतां माझी चिंता तुज कां पंढरिनाथा । असो दे भलभलता भलतेंच ठायीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जन्ममरणांच्या चुकवा रे खेपा । यासी तो सोपा राममंत्र ॥१॥ वेळोवेळां वाचे उच्चारावें नाम । तेणें निष्काम प्राणी होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जन्मला देह पोशिला सुखाचा । काय भरंवसा याचा आहे ॥१॥ येकलेंचि यावें येकलेंचि जावें । हेंचि अनुभवावें आपणाची ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा