भजनी मालिका

भजने

जपजाप्य मंत्र नको यंत्र तंत्र । वर्णिजें जगत्र रामनाम ॥१॥ पाउला पाउली घडतसें यज्ञ । तेणें सर्व पुण्य हातीं जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जपतां नाम पडे धाक । पातकें पळती त्रिवाटे देख । कळिकाळाचें नासे दुःख । ऐसें नामीं सामर्थ्य ॥१॥ जप तप नामावळी । आणिक नको मंत्रावळी । ब्रह्माज्ञान बोली । वायां शीण आटाआटी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जपाचें निमित्त झोपेचा पसर । देहाचा विसरू पाडूनियां ॥१॥ ऐसीं तीं भजनें अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जंबुया द्वीपामाजी एक पंढरपुरगांच । धर्माचें नगर द्खा विठो पाटील त्वाचें नांव । चला जाऊं तया ठाया कांहीं भोजन मागाया ॥१॥ विठोबाचा धर्म जागो । त्याचे चरणीं लक्ष लागो । ज्याशी नाहीं पंख पाय तेणें करावें तें काय ।

रचनाकार: संत नामदेव

जय गोविंदा परमानंदा ऐक माझें बोल । निर्गुणरुपें असतां तुझें कांहींच नव्हें मोल । मग तुं माया रुप धरणी अती जाहलासी सबळ । नसतें देवपणा अंगी आणुनी चाळविसी केवळ ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

जय विश्वव्यापका विश्वमुर्ति वंदन । वर्णितां थकलें सहा अठराजण । मुनिजन धुंडती साधिती साधन । नव्हे दरुशन तयांसी ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

जयजय राम नाम दो अक्षरीं । सहस्त्र नामावरी ब्रीद गाजे ॥१॥ उफराटें अक्षरीं वाल्मिक वैखरी । सहस्त्र नामावरी उच्चारिलें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयजय रामचंद्रा जयजय रामचंद्रा । हर हरि जपे त्याचे हृदयीं मुद्रा ॥१॥ सोपा जप अखंड वाचेसी वदतां । कामक्रोध लोभ पळे अहं ममता ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयजय वो जनार्दनें विश्वव्यापक सपुर्ण वो । सगुन अगुण विगुण पुर्णपूर्णानंदघन वो ॥१॥ ब्रह्मा विष्णु रुद्र निर्माण तुजपासुनी वो । गुणत्रय उभय वनीं तुंचि पंचक अंतःकरणीं वो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जयजयकारें टाळी पिटली सकळां । घातियेली शिळा समाधिसी ॥१॥ निवृत्तिमुक्ताईनें घातियेली घोन । करितो समाधान पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जयजयकारें टाळी पिटिली सकळीं । चालली मंडली वैष्णवांची ॥१॥ पंढरीचा पोहा निघाला बाहेरी । कीर्तन गजरीं पुढें होत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जयदेव जयदेव जय विश्वंभरा । दर्शन व्यापक तुजविण नाही दुसरा । तारक मारक हरि तू भक्तांचा सोयरा । आरती ओवाळू तुज परात्परा ॥१॥

रचनाकार: संत बोधले