भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्ममरणाचें निवारेल दुःख । करितां देख कीर्तन

janmamaranachen nivarel duhkh | karitan dekh kirtan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्ममरणाचें निवारेल दुःख । करितां देख कीर्तन ॥१॥ नारद प्रल्हाद अंबऋषी । विनटले कीर्तनासी ॥२॥ व्यास शुक वामदेव । धरिती भाव कीर्तनीं ॥३॥ एका त्याचा दास खरा । करी पसारा कीर्तन ॥४॥