भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मलें तें बाळ । परी वाट पाहे काळ

janmalen ten bal | pari vat pahe kal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्मलें तें बाळ । परी वाट पाहे काळ ॥१॥ नाहीं संतसमागम । सदाविषयाचें काम ॥२॥ मुखीं रामनाम नाहीं । सदा संसार प्रवाहीं ॥३॥ एका जनार्दनीं भुलोन । स्त्रीआधीन जाहला दीन ॥४॥