भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्ममरणांच्या चुकवा रे खेपा । यासी तो सोपा राममंत्र

janmamarananchya chukava re khepa | yasi to sopa ramamantra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्ममरणांच्या चुकवा रे खेपा । यासी तो सोपा राममंत्र ॥१॥ वेळोवेळां वाचे उच्चारावें नाम । तेणें निष्काम प्राणी होय ॥२॥ सायास नाहीं अनायासें वर्म । वाचे रामनाम आठवावें ॥३॥ एका जनार्दनीं नामविण काहीं । आणिक थोर नाहीं कलीमाजीं ॥४॥