भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया

janmamarananchi kayasi chinta | tujhya sharanagatan pandhariraya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥१॥ वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय काय ॥ध्रु.॥ हृदयीं तुझें रूप बिंबलें साकार । तेथें कोण पार संसाराचा ॥२॥ तुका म्हणे तुझ्या चरणांची पाखर । असतां कळिकाळ पायां तळीं ॥३॥