भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्ममरणा निवारिती । जे दाविती सुपंथ

janmamarana nivariti | je daviti supanth

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जन्ममरणा निवारिती । जे दाविती सुपंथ ॥१॥ बैसविती अक्षयपदीं । ब्रम्हानंदी कृपाळू ॥२॥ एकाचि वचनें सिध्दासनीं । करिती बैसउनी अगाध ॥३॥ निळा म्हणे उत्तीर्णत्वासी । दुर्लभ पाशीं कवण वस्तु ॥४॥