भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्ममरणांची विसरलों चिंता । तूं माझा अनंता मायबाप

janmamarananchi visaralon chinta | tun majha ananta mayabap

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जन्ममरणांची विसरलों चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥१॥ होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय आणि भार निरसलीं ॥ध्रु.॥ लिगाडाचें मूळ होतीं पंच भूतें । ज्याचें त्या पुरतें विभागिलें ॥२॥ तुका म्हणे जाला प्रपंच पारिखा । जिवासी तूं सखा पांडुरंग ॥३॥