भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें

kay vanun atan na pure he vani | mastak charanin thevitasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥२॥ भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥३॥ तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें स्रवतसे ॥४॥