भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय वाणूं आतां पायाचा महिमा । जेथें झाली सीमा बोलायाची

kay vanun atan payacha mahima | jethen jhali sima bolayachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय वाणूं आतां पायाचा महिमा । जेथें झाली सीमा बोलायाची ॥१॥ विठोबाचे पाय आठवितां मनीं । गेलें हरपोनी भवभय ॥२॥ पाय नारदानें ह्लदयीं धरितां । ब्रम्हांडीं मान्यता झाली त्याची ॥३॥ सनकादिकांलागीं पाय वज्र कवच । ब्रह्मादि-देवांस पद जेणें ॥४॥ लागतांचि पाय शिळा दिव्य झाली । पाषाण तारिले उदकावरी ॥५॥ पाय ते रमेचे सौभाग्य साजिरें । योगि ऋषीश्वर थोर जेणें ॥६॥ नामा म्हणे मनीं पाय सर्वकाळ । म्हणोनि सुकाळ आनंदाचा ॥७॥