भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय म्यां मानावें हरीकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें

kay myan manaven harikathechen phal | tarije sakal janin aisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय म्यां मानावें हरीकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें ॥१॥ उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥ध्रु.॥ पापाविण नाहीं पाप येत पुढें । साक्षसी रोकडें साक्ष आलें ॥२॥ तुका म्हणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां ॥३॥