भजनी मालिका
← भजनांकडे परत

कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे

kan gan rusalasi krupalun ba hari | tujavin dusari bhakti nene

रचनाकार: संत सावता · अभंग
कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥ दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥ २ ॥ आशा मोह माया लागलीसे पाठीं । काळ क्रोध दृष्टी पाहतसे ॥ ३ ॥ सावता म्हणे देवा नका ठेऊं येथें । उचलोनी अनंते नेई वेगीं ॥ ४ ॥