भजनी मालिका
← भजनांकडे परत

कमळाच्या स्कंधी गुणी गुढारलें

kamalachya skandhi guni gudharalen

कमळाच्या स्कंधी गुणी गुढारलें । वरी आकारलें फूल तया ॥ १ ॥ सुमनाचेनि वासें भ्रमरभुलले । मार्ग पैं विसरले इंद्रियांचा ॥ २ ॥ तैसेहे संत विठ्ठलीं तृप्त । नित्य पैं निवांत हरि चरणीं ॥ ३ ॥ नाठवे हें दिन नाठवे निशी । अखंड आम्हांसि हरिराजा ॥ ४ ॥ तल्लिन प्रेमाचे कल्लोळ अमृताचे । डिंगर हरिचे राजहंस ॥ ५ ॥ टाहो करूं थोर विठ्ठल कीर्तनें । नामाच्या सुमनें हरि पुजूं ॥ ६ ॥ निवृत्ति निवांत तल्लीन पै झाला । प्रपंच आबोला हरिसंगें ॥ ७ ॥