भजनी मालिका
← भजनांकडे परत

कमळगर्भींचा गाभा । तोचि उभा पंढरीये

kamalagarbhincha gabha | tochi ubha pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कमळगर्भींचा गाभा । तोचि उभा पंढरीये ॥१॥ वेधलें चरणीं मन माझें । नावडे दुजें तयाविण ॥२॥ ध्यान बैसलें हृदयीं । तयाविण दुसरे नाहीं ॥३॥ बैसलो तो नुठे मागें । एका जनार्दनीं गूज सांगें ॥४॥