भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथे उभा अंग राखेल जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा

kathe ubha ang rakhel jo koni | aisa kon gani taya papa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथे उभा अंग राखेल जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥१॥ येथे तो पातकी न येता च भला । रणीं कुचराला काय चाले ॥ध्रु.॥ कथे बैसोनी आणीक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥२॥ तुका म्हणे ऐलपैल ते थडीचे । बुडतील साच मध्यभागीं ॥३॥