भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथा हें भूषण जनामध्ये सार । तरले अपार बहुत येणें

katha hen bhushan janamadhye sar | tarale apar bahut yenen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथा हें भूषण जनामध्ये सार । तरले अपार बहुत येणें ॥१॥ नीचिये कुळींचा उंच वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ध्रु.॥ देव त्याची माथां वंदी पायधुर्ळी । दीप झाला कुळीं वंशाचिये ॥२॥ त्याची निंदा करी त्याची कुष्ठ वाणी । मुख संवदणी रजकाची ॥३॥ तुका म्हणे नाहीं चोरीचा व्यापार । विठ्ठलाचें सार नाम घ्यावें ॥४॥