भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका बापा माझ्या पंढरीच्या राया कीर्तना आल्यें या आर्तभूतां

aika bapa majhya pandharichya raya kirtana alyen ya artabhutan

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऐका बापा माझ्या पंढरीच्या राया कीर्तना आल्यें या आर्तभूतां ॥१ ॥ माझ्या दुणेदारा पुरवीं त्याची आसनकरींनिरासआर्तभूतां॥२॥ त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा अभय तो द्यावा कर तय ॥३॥ जैसा चंद्रश्रवा सूर्य उच्चैश्रवा। अढळपद ध्रुवा दिधलेंसें ॥४॥ उपमन्यु बाळका क्षीराचा सागरू । ऐसा तूं दातारू काय वानूं॥५॥ म्हणे दासी जनी आलें या कीर्तनीं तथा कंठाळुनी पिटूं नका ॥६॥