भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका हो भोळे भाविक जन । नित्य करा गुरुस्मरण

aika ho bhole bhavik jan | nitya kara gurusmaran

रचनाकार: संत बोधले · अभंग
ऐका हो भोळे भाविक जन । नित्य करा गुरुस्मरण । होईल दोषांचे दहन। गुरुचे स्मरण केलिया ॥ १॥ गुरुसेवा घडे ज्यासी । कळिकाळ न बाघे त्यासी । त्यांनी साधिले मोक्षासी । गुरुचे स्मरण केलिया ॥ २॥ गुरु ज्ञानाचा आगरु । गुरु धैर्याचा मेरु । नौका नेईल पारु। गुरुचे स्मरण केलिया ॥३॥ गुरु मायेचे मूळ जीव । गुरु मोक्षपदाचा ठाव । साध्य होती सर्व देव । गुरुचे स्मरण केलिया ॥४॥ जय जय गुरु मायबापा । चुकवी चौऱ्यांशीच्या खेपा । बोधला ध्यातो निज स्वरुपा । पर ठायी लय लावुनी ॥५॥