भजनी मालिका

भजने

ऐशिया सुखामाजीं राहेन सुखरुप । दुजा वागों नेदी आड येऊं संकल्प । भोगिन याचोंचि वो सर्वदा पडप । करुनि भावना अखंड तद्रूप वों ॥१॥ ऐशी ये निश्चयाची सांगितली मात । तुम्हीही आयका हो कृपावंत संत । नकळे माझा मज सत्याचा इत्यर्थ । तुम्हीचि दावाल तो मानीन हितार्थ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐशियाचे घरीं ऐसीचि मी सदा । न करुनी कांही धंदा सर्वहि करी ॥१॥ सदाचि निष्काम सदा मी मी सकाम । सद रुप नाम नूतन माझें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐशी अगाध चरित्रें याची । वर्णिता मागला शेष विरंची । लोक म्हणती हा सर्प बिलोंची । कैसेनि पां वांचला ॥१॥ मग त्या सांगे नारायण । यासी गेलें वर्ष होऊन । गोवळ वत्सें बहमसदन । पावोनि होते बैसले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐशी आवडी आहे माझ्या जीवा । तुजसि केशवा निवेदिलें। ॥१॥ पांडुरंगा ऐसें वाटतसे जीवा । करिन संतसेवा अहन्निशी ॥२॥

रचनाकार: संत सेना

ऐशीं निर्धारें विरहिण करी । परेपरता देखेन श्रीहरी । मन पवन साधन न करीं । संतसंग घडलिया धन्य संसारीं ॥१॥ धन्य धन्य संतमहिमा । विरह गेला पावलें सुखधामा ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

ऐश्वर्याचीं वचनाक्षरें । वदती मधुरें तत्वदातीं ॥१॥ श्रवण करिती सात्विक लोक । पावती सुख कैवल्य ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

ऐसा अवतार नरहरि स्तंभामाझारी । भक्तांपरोपरी धरी रुपें ॥१॥ धरुनिया महीत्व झाला नृसिंहरुप । वेदशास्त्रांसी अमूर्त मूर्तीस आला ॥२॥

ऐसा आज्ञापी भक्तांसी आपण । त्यागा अभिमान तुह्मीं जाणा ॥१॥ जाणावें प्रत्यक्ष स्वरूप सगुण । सर्व नारायण तोचि दिसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ ध्रु॥ इतन गोते काहे खाता । जब तूं आपणा भूल न होता ॥१॥ अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम