भजनी मालिका

भजने

योगयाग तप जयासाठीं करणें । तें उभे कोणें पंढरीसी ॥१॥ काउलाची पेठ पंढरीचा हाट । मिळाले घनदाट वानकरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

योगयाग तप व्रतें आचरितां । नाम सोपें गातांसर्व जोडें ॥१॥ पाहोनियां प्रचीत नाम घे अनंत । तुटे नाना जपे नाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

योगाभ्यास साधताचि सांग । येति उपसर्ग सिध्दींचे ॥१॥ कैंचि तेथें हरीसी भेटी । विवंचना शेवटी काळाचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

योगि मुनि जन तपस्वी याज्ञिक । ते तव पादुका वंदिती शिरीं ॥१॥ हरिहर ब्रह्मा सूर्य चंद्रादिक । ओढवी मस्तक रजरेणु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

योगियां न कळे वर्म । कोणा साधे शुद्ध कर्म । न घ्डे दान आणि धर्म । वाउगा श्रम जाणिवेचा ॥१॥ मुखें गाउं नाम वाचे । ब्रह्माज्ञान पुढें नाचे । भय नाहीं पापियां दुतांचे । आम्हांसी ते सर्वथा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

योगियांचा मुकुट म्हणती धूर्जटी । तोही रामनाम कंठी जपताहे ॥१॥ स्पशानी तो राहे रामनाम गाये । भोवतें उभे पाहे ऋषी सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

योगियांचा योग साधन तें सांग । तो पांडुरंग विटेवरी ॥१॥ मुमुक्ष संपदा ज्ञानीयाचा बांधा । तो पांडुरंग विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

योगियाचा राजा कैलासवासी गे माये। गाती नारद तुंबर पुढे बसवा आहे ॥१॥ गळां रुंडमाळा वासुकीचें भूषण । गजचर्म पांघुरला। अंगी भस्माचें लेपन ॥२॥

रचनाकार: संत सेना

योगियांचें ध्यान पैं विश्रांती । आदिशक्ति म्हणती तुम्हांलागी ॥१॥ नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवां वंद्य । अकार उकार मकार भेद मावळला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

योगियांचें ब्रह्म शून्य व्योमाकार । आमुचें साकार विटेवरी ॥१॥ दाटुंगें नागर कटीं ठेऊनि कर । सर्प्वस्वें उदार भक्ता-लागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

योगी चिंतिती चिंतनीं । ध्यानीं मनीं रुप ज्याचें ॥१॥ तो हा अकल्पितचि आला । उभा केला पुंडलिकें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

योगी ध्याती जया चिंतिती मानसी । तो हृषीकेशी पंढरीये ॥१॥ जाऊं लवलाहे पाहूं पैं चरण । क्षेमालिंगन देऊं सुखें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

योगी परम ध्यानीं बैसलिया जाणा । कांहीं या रे मना विश्रांति नुपजे ॥१॥ तुजवीण दुसरें कांहींच नाठवे । लागली तुझी सवे विष्णुदासा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव