भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगयाग तप जयासाठीं करणें । तें उभे कोणें पंढरीसी

yogayag tap jayasathin karanen | ten ubhe konen pandharisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
योगयाग तप जयासाठीं करणें । तें उभे कोणें पंढरीसी ॥१॥ काउलाची पेठ पंढरीचा हाट । मिळाले घनदाट वानकरी ॥२॥ पताकांचे भार गर्जती हरिदास । होऊनी उदास सर्वभावें ॥३॥ एका जनार्दनीं नाहीं कामक्रोध । अवघा गोविंद हृदयीं त्यांचें ॥४॥