भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगियांचें ब्रह्म शून्य व्योमाकार । आमुचें साकार विटेवरी

yogiyanchen brahma shunya vyomakar | amuchen sakar vitevari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
योगियांचें ब्रह्म शून्य व्योमाकार । आमुचें साकार विटेवरी ॥१॥ दाटुंगें नागर कटीं ठेऊनि कर । सर्प्वस्वें उदार भक्ता-लागीं ॥२॥ ज्ञानीया सिद्धांतीं लक्षापरी नये । आमुची वाट पाहे अनाथाची ॥३॥ पुंडलिका भावा वोळले वोरसें । नेणों काय कैसें प्रेम त्याचें ॥४॥ जाप्यकाचें जाप्य नाम मंत्रमय । आमुचें भक्तीप्रिय संसारी कं ॥५॥ नाम ह्मणे जीवें करीन ओंवा-ळणी । झणीं चक्रपाणी दिठावसी ॥६॥