भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगियांचें ध्यान पैं विश्रांती । आदिशक्ति म्हणती तुम्हांलागी

yogiyanchen dhyan pain vishranti | adishakti mhanati tumhanlagi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
योगियांचें ध्यान पैं विश्रांती । आदिशक्ति म्हणती तुम्हांलागी ॥१॥ नित्य मुक्त तुम्ही सर्व जीवां वंद्य । अकार उकार मकार भेद मावळला ॥२॥ अहं सोहं कोहं तुमचा प्रकार । वेदशास्त्र सार तुम्ही जाणां ॥३॥ अनुग्रह कृपेचा मजलागीं तो द्यावा । एका जनार्दनीं करावा कृपापात्र ॥४॥