भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगियांचा मुकुट म्हणती धूर्जटी । तोही रामनाम कंठी जपताहे

yogiyancha mukut mhanati dhurjati | tohi ramanam kanthi japatahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
योगियांचा मुकुट म्हणती धूर्जटी । तोही रामनाम कंठी जपताहे ॥१॥ स्पशानी तो राहे रामनाम गाये । भोवतें उभे पाहे ऋषी सर्व ॥२॥ सदा समाधिस्त रामनामें रंगला । वाचे सदा चाळा रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं श्रीरामावांचुनीं । दुजा छंद मनीं नाही त्याचे ॥४॥