भजनी मालिका

भजने

आइका पांडुरंगा एक मात । काही बोलणे आहे एकांत । आम्हां जरी तारील संचित । तरीच उचित काय तुझे ॥१॥ उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनी भूषण । वांयां थोर पण जनामध्यें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडावी सोई भ्रताराची ॥१॥ नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

आइकावी माझीं कवतुकउत्तरें । देउनी सादरें चित्त देवा ॥१॥ वोरसें आवडी आलों पायापासीं । होय तें मनेसीं सुख कीजे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आइकिली कीर्त्ति संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥१॥ मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आइके नारायणा वचन माझें खरें । सांगतों निर्धारें तुजपासीं ॥१॥ नाहीं भाव मज पडिली लोककाज । राहिलेंसे काज तुझे पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम