भजनी मालिका
← भजनांकडे परत

आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं

aityachi rashi | ali pakasiddhipashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं ॥१॥ आतां सोडोनि भोजन । भिके जावें वेडेपण ॥ध्रु.॥ उसंतिली वाट । मागें परतावें फुकट ॥२॥ तुका म्हणे वाणी । वेचों बैसोन ठाकणीं ॥३॥