भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो ब्राम्हांड पाळका । ऐकें रुक्मिणीच्या कुंका

aho bramhand palaka | aiken rukminichya kunka

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अहो ब्राम्हांड पाळका । ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥ देवा घेतलें पदरीं । तें तूं टाकूं नको दुरी ॥२॥ होतें लोकांमध्यें निंद्य । तें त्वां जगांत केलें वंद्य ॥३॥ विनवीतसे दासी जनी । परिसावी माझी विनवणी ॥४॥