भजनी मालिका
← भजनांकडे परत

आइके नारायणा वचन माझें खरें । सांगतों निर्धारें तुजपासीं

aike narayana vachan majhen kharen | sangaton nirdharen tujapasin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आइके नारायणा वचन माझें खरें । सांगतों निर्धारें तुजपासीं ॥१॥ नाहीं भाव मज पडिली लोककाज । राहिलेंसे काज तुझे पायीं ॥ध्रु.॥ वरदळ भक्ती करितो मी नित्य परी नाही चित्त तुझे पाइ ॥२॥ जरि तुज कांहीं करणें उचित । तारीं तूं पतित तुका म्हणे ॥३॥