भजनी मालिका
← भजनांकडे परत

आइकिली कीर्त्ति संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ

aikili kirtti santanchya vadanin | tari hen thakoni alon sthal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आइकिली कीर्त्ति संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥१॥ मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये देवा ॥ध्रु.॥ आह्मासी विश्वास नामाचा आधार । तुटतां हे थार उरी नाहीं ॥२॥ तुका म्हणे येथें नसावें चि दुजें । विनंती पंढरिराजें परिसावी हे ॥३॥