भजनी मालिका
← भजनांकडे परत

आइका पांडुरंगा एक मात । काही बोलणे आहे एकांत । आम्हां जरी तारील संचित । तरीच उचित काय तुझे

aika panduranga ek mat | kahi bolane ahe ekant | amhan jari taril sanchit | tarich uchit kay tujhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आइका पांडुरंगा एक मात । काही बोलणे आहे एकांत । आम्हां जरी तारील संचित । तरीच उचित काय तुझे ॥१॥ उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनी भूषण । वांयां थोर पण जनामध्यें ॥ध्रु.॥ अन्न जरी न मिळे तयासी देणें । अंगातुक पात्र उचित दान । उपकार तरी धन्वंतरीपणें । जरी देणें घेणें नाहीं आशा ॥२॥ शूर तो तयासी बोलणे जाणा । पाठीसी घालूनी राखे दिना । पार पुण्या त्या नाही भूषणा । एक नारायणा वचन हें ॥३॥ आतां पुढे बोलणें ते कांहीं । मज तारिसील तरीच सही । वचन आपुले सिद्धी नेई । तुका म्हणे तई मज काळसी ॥४॥