भजनी मालिका
← भजनांकडे परत

आइत्या भाग्या धणी व्हावे । केणें घ्यावे न सरे ते

aitya bhagya dhani vhave | kenen ghyave na sare te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आइत्या भाग्या धणी व्हावे । केणें घ्यावे न सरे ते ॥१॥ केणे आहे पंढरपुरी । उधारीचे लाभीक ॥ध्रु.॥ बाखराची करुनी रिती । भरा पोती सकळ ॥२॥ तुका म्हणे संतांपाडे । करा पुढे वाखती ॥३॥