भजनी मालिका

भजने

दृष्टीविण देखणें रसनेविण चाखणें । शब्देंविण बोलणें ऐसें आहे ॥१॥ चरणेंविण चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें गुज ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दे दे दे मोरी कन्हया साडीछे । तुम भलो नंदजी नंदन लालसे ॥१॥ मैतो आई मथुरा हाटछे । बिगरी तु क्या धरे घाटछे कन्हया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देइ डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी ॥१॥ तुज बुडवावें ऐसा कोण धर्म । अहर्नीशीं नाम घेतां थोडें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देऊनि भातुकें गळां घाली मिठी । सखा जगजेठी भक्ती भावा ॥१॥ आधार करोनि राहिले पंढरीं । तेथें निरंतरीं प्रेम दावी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देऊनिया अभयदान । संतीं केलें मज पावन । निरसोनी भवबंधन । तारिलें मज ॥१॥ ऐसा संतसमागम । नाहीं आणीक विश्रामक । योगीयांचें धाम कुंठीत पैं झाले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देऊनियां पत्र निघालीं सत्वर । करुनि नमस्कार सकळांसी ॥१॥ जाउनी राहिले भोगावती तीरीं । तीर्थयात्रा बरी संपादिली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देऊनियां वर दंडपाणी गेला । ध्यास पारध्याला मृगा-चाची ॥१॥ लाऊनियां चित्त ऐके चळवळ । दृष्टीची तळमळ लक्ष तेथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देऊळ बांधिलें कळस साधिलें । स्थापन तें केलें लिंगाप्रती ॥१॥ पाया जो खांदला मध्येचि भंगला । शब्द मावळला काय सांगों ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देख देख देख पैल पैल । पैल उभा असे विटेवरी ॥१॥ खोळे बुंथीचा आकारु झकळे पीतांबरु । सौभाग्य सुंदरु विठ्ठल देव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव