भजनी मालिका
← भजनांकडे परत

देऊनिया अभयदान । संतीं केलें मज पावन । निरसोनी भवबंधन । तारिलें मज

deuniya abhayadan | santin kelen maj pavan | nirasoni bhavabandhan | tarilen maj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देऊनिया अभयदान । संतीं केलें मज पावन । निरसोनी भवबंधन । तारिलें मज ॥१॥ ऐसा संतसमागम । नाहीं आणीक विश्रामक । योगीयांचें धाम कुंठीत पैं झाले ॥२॥ आणीक एक वर्म । मुख्य इंद्रियांचा धर्म । मन ठेवुनी विश्राम । नामचिंतन करावें ॥३॥ एका जनार्दनीं जाण । संत आमुचें निजधान । काया वाच मन । दृढ पायीं ॥४॥