भजनी मालिका
← भजनांकडे परत

देऊनियां पत्र निघालीं सत्वर । करुनि नमस्कार सकळांसी

deuniyan patra nighalin satvar | karuni namaskar sakalansi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देऊनियां पत्र निघालीं सत्वर । करुनि नमस्कार सकळांसी ॥१॥ जाउनी राहिले भोगावती तीरीं । तीर्थयात्रा बरी संपादिली ॥२॥ अनाथें पतितें शरणागत दीनें । अनाथ करणेम कृपादृष्टि ॥३॥ केली ब्रह्मसभा बैसले वरिष्ठ । होतें तैसें स्पष्ट निवेदिलें ॥४॥ पत्र वाचुनियां सकळां जालें श्रुत । संन्याशाचे पुत्र कळों आलें ॥५॥ नाहीं प्रायश्चित्त उभयंता कुळभ्रष्ट । बोलियेले श्रेष्ठ पूर्वापार ॥६॥ या एक उपाय असे शास्त्रमतेम । अनन्यभक्तीतें अनुसरावें ॥७॥ तीव्र अनुतापें करावेम भजन । गो खर आणि श्वान वंदुनियां ॥८॥ वंदावें अंत्यज ब्रह्मभावनेसीं । ऐसे पद्धतीसी बोलियेले ॥९॥ ऐकोनि निवृत्ती संतोषला चित्तीं । धन्य तुमची वदंती तीर्थरुप ॥१०॥ ज्ञानदेव म्हणे सांगाल तें मान्य ।मुक्ताई सोपान आनंदिलीं ॥११॥