भजनी मालिका
← भजनांकडे परत

देऊनियां वर दंडपाणी गेला । ध्यास पारध्याला मृगा-चाची

deuniyan var dandapani gela | dhyas paradhyala mruga-chachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देऊनियां वर दंडपाणी गेला । ध्यास पारध्याला मृगा-चाची ॥१॥ लाऊनियां चित्त ऐके चळवळ । दृष्टीची तळमळ लक्ष तेथें ॥२॥ उगवला दीन जाहला प्रकश । मृग पक्षीयास दृष्टि झाली ॥३॥ तोचि मृग पाहा आला उदकासी । उडाण गगनासी साधीतसे ॥४॥ तृषाकांत मोठा चालीला नि:संग । प्रारब्धाचा भोग ओढवला ॥५॥ उदकाचिये हांवें दृष्टि झाली दुरी । पाश तो समोरी देखेचिना ॥६॥ येऊनियां पडे जाळिया माझारी । लोळे पृ-थ्वीवरी एकसरा ॥७॥ नामा ह्मणे भिल्लें पाहातां लोचनीं । वोढो-नियां गुणीं बाण लावी ॥८॥