भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृष्टीविण देखणें रसनेविण चाखणें । शब्देंविण बोलणें ऐसें आहे

drushtivin dekhanen rasanevin chakhanen | shabdenvin bolanen aisen ahe

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दृष्टीविण देखणें रसनेविण चाखणें । शब्देंविण बोलणें ऐसें आहे ॥१॥ चरणेंविण चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें चालणें निजकरोंविण घेणें । श्रवणेंविण ऐकणें तेथींचें गुज ॥२॥ चित्तेंविण चिंतणें बुध्दीविण जाणणें । मनेंविण अनुभवणें अनुभव्यातें ॥३॥ निळा म्हणे गगनें गगना आलिंगन । पवनासवें गमन पवना जेवीं ॥४॥