भजनी मालिका
← भजनांकडे परत

देई भक्तिरस प्रेमा । देवा घाली आम्हां जन्मां

dei bhaktiras prema | deva ghali amhan janman

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देई भक्तिरस प्रेमा । देवा घाली आम्हां जन्मां ॥१॥ प्रेम येई हातां जरी । जेथें नांदू ती पंढरी ॥२॥ ज्ञानदेवीं भेट व्हावी । ज्ञान गोष्ट कां सांगावी ॥३॥ नामा न बुझावा जनीं । कोण नाचेल कीर्तनीं ॥४॥ पुरवा नामयाच्या आर्ता । देवा सांगे जगन्माता ॥५॥