भजनी मालिका

भजने

जांताचि गोकुळा बाहेरी । कृष्णपाउलांचिया हारी । उमटल्या देखोनि महीवरी । प्रेमा अंतरीं न संटे ॥१॥ चरणमुद्रांकित चिन्हें । देखोनि घाली लोटांगणें । अंतर्निष्ठेंचें हें लेणें । लेउनी निमग्न ते ठायी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जातांना राउळीं परीस मागे नामा । पाहूं द्या तो आम्हां कैसा आहे ॥१॥ राजाईनें त्वरें आणूनियां दिला । नाम्यानें तो घेतिला सव्य करीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाति ज्ञान नाहीं मति ज्ञान फर । फुंजे दंभाकार लौकिकांत ॥१॥ तेथें माझ्या मना नव्हे समाधान । न पाविजे खूण संतांवीण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये ॥१॥ होणार तें घडो होणाराच्या गुणें । होईल नारायणें निर्मीलें तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जाती ब्रह्मादिक जाती चराचर । मायिक व्यवहार ऐशा परी ॥१॥ प्रकृति पुरुषाचा मांडियेला खेळ । जाईल सकळ नाशिवंत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जातीचा पाईक ओळखे पाईका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥१॥ धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जातीचे हे शिंपी विश्व जाणे यातें । प्रत्यक्ष सांगाते जेवविलें ॥१॥ उच्छिष्ट निजमुखीं स्वीकारिलें याचें । उरलें तें तुम्हां कैचें क्रियाकर्म ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जानकीची शुद्धी करावया गेला । हनुमंत उडाला जेथुनियां ॥१॥ आनंदभरित चालतसे मार्ग । ह्रदयीं अनुराग आवडीचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जाय जणा देह जाईल नेणसी । लैकिक मिरविसी लाजसी ना ॥१॥ माझें माझें माझें मानिसी निभ्रांत । करिसी अपघात रात्रंदिवस ॥२॥

रचनाकार: संत नामदेव