भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाती पंढरीस । म्हणे जाईन तयांस

jati pandharis | mhane jain tayans

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाती पंढरीस । म्हणे जाईन तयांस ॥१॥ तया आहे संवसार । ऐसें बोले तो माहार ॥ध्रु.॥ असो नसो भाव । जो हा देखे पंढरिराव ॥२॥ चंद्रभागे न्हाती । तुका म्हणे भलते याती ॥३॥