भजनी मालिका
← भजनांकडे परत

जानकीची शुद्धी करावया गेला । हनुमंत उडाला जेथुनियां

janakichi shuddhi karavaya gela | hanumant udala jethuniyan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जानकीची शुद्धी करावया गेला । हनुमंत उडाला जेथुनियां ॥१॥ आनंदभरित चालतसे मार्ग । ह्रदयीं अनुराग आवडीचा ॥२॥ तें स्थान वंदुनी पावला गोकर्ण । हाटकेश्वरीं स्नान करुनियां ॥३॥ आला कोल्हापुरा लक्षुमी दरुषणा । पंचगंगे स्नान करुनियां ॥४॥ प्रीतीचा संगम देखिला कर्‍हाटकीं । थोर जाला सुखी अंतरींचा ॥५॥ कृष्णोचिया स्नानें कृतकृत्य जाला । माहुली देखिला संगम डोळां ॥६॥ आला आळंकावती हर्षयुक्त चित्तीम । दिधलें सिदोपंतीं आलिंगन ॥७॥ विठठल अंतरीं मातापिता पाहावी । आज्ञा म्हणे द्यावी सिदोपंतां ॥८॥