भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाति ज्ञान नाहीं मति ज्ञान फर । फुंजे दंभाकार लौकिकांत

jati dnyan nahin mati dnyan phar | phunje dambhakar laukikant

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जाति ज्ञान नाहीं मति ज्ञान फर । फुंजे दंभाकार लौकिकांत ॥१॥ तेथें माझ्या मना नव्हे समाधान । न पाविजे खूण संतांवीण ॥२॥ संत तेचि जाणा शांत ज्याचें मन । अणूचें प्रमाण दुजें नाहीं ॥३॥ विठा म्हणे तेथें स्थिरावलें मन । झालें समाधाम त्याचेसंगें ॥४॥