भजनी मालिका
← भजनांकडे परत

जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम

jatichen ten chadhe prem | pakshi smare ram ram

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥१॥ ते काय गुण लागती येरां । कागा न शोभे पिंजरा ॥ध्रु.॥ शिकविलें तें सुजात सोसी । मग मोल चढे त्यासी ॥२॥ तुका म्हणे वेषधारी ॥ हिजड्या नव्हती त्या नारी ॥३॥