भजनी मालिका
← भजनांकडे परत

जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा

jato na yetiya vata | kay niravito karanta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥ कैसा जालासे बेशरम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ध्रु.॥ पाहे वैरियाकडे। डोळे वासुनियां रडे ॥२॥ बांधुनियां यमा हातीं । दिला नाहीं त्याची खंती ॥३॥ नाहीं यांपें काम । ऐसें जाणे तो अधम ॥४॥ अझुन तरि मुका । कां रे झालासि म्हणे तुका ॥५॥