भजनी मालिका
← भजनांकडे परत

जांताचि गोकुळा बाहेरी । कृष्णपाउलांचिया हारी । उमटल्या देखोनि महीवरी । प्रेमा अंतरीं न संटे

jantachi gokula baheri | krushnapaulanchiya hari | umatalya dekhoni mahivari | prema antarin na sante

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जांताचि गोकुळा बाहेरी । कृष्णपाउलांचिया हारी । उमटल्या देखोनि महीवरी । प्रेमा अंतरीं न संटे ॥१॥ चरणमुद्रांकित चिन्हें । देखोनि घाली लोटांगणें । अंतर्निष्ठेंचें हें लेणें । लेउनी निमग्न ते ठायी ॥२॥ आनंदाश्रु गळती नेत्रीं । स्वेदरोमांच उठती गात्रीं । कंप स्फुंदनें विकळ गात्रीं । सद्रदितु मुरकुंडें ॥३॥ सर्व साक्षी नारायण । जाणेनियां त्याचें चिन्ह । आला अति त्वरें धांवोन । तया उमजवून आलिंगी ॥४॥ दोघां हो सरली भेटी । पडिली आनंदाची मिठी । मग अचळ पुसोनियां मुखवटीं । परम कृपेनें न्याहाळी ॥५॥ पुसे अंतरीचें गुज । तयापाशीं अधोक्षज । येरें वंदूनियां चरणरज । मंजुळा उत्तरीं बोलतु ॥६॥ निळा म्हणे स्तवन करी । मग नि:स्तब्ध्‍ा निमिषवरी । अवलोकुनियां चरणावरीं । ठेवीं मस्त्क क्षणाक्षणा ॥७॥