भजनी मालिका
← भजनांकडे परत

जातिकुळ माझें गेलें हारपोनि

jatikul majhen gelen haraponi

जातिकुळ माझें गेलें हारपोनि श्रीरंगावांचुनी आनु नेंणें ॥१॥ किती वो शिकवाल मज वेळोवेळां । मी तया गोवळा रातलिये ॥२॥ अष्टभोग भोगणें माते नाहीं चाड । भक्तिप्रेम गोड लेईलेंगे माये ॥३॥ बापरखुमादेवीवरु जीवींचा जिव्हाळा । कांही केलिया वेगळा नव्हेगे माये ॥४॥