भजनी मालिका
← भजनांकडे परत

जातीचा पाईक ओळखे पाईका । आदर तो एका त्याचे ठायीं

jaticha paik olakhe paika | adar to eka tyache thayin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जातीचा पाईक ओळखे पाईका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥१॥ धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥ध्रु.॥ जीताचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥२॥ तुका म्हणे नमूं देव ह्मुण जना । झालियांच्या खुणा जाणतसों ॥३॥