भजनी मालिका

भजने

जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडी हे विधि । निषेधींचि चांगली ॥१॥ तूं स्वामी मी सेवक । उंच पद निंच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जंव देहातें देखती तंव माझें म्हणती । निमालीया रांडा पोरें रडतीं ॥१॥ पहा कैसा अनुभव लौकिकाचा । देह निमाला कीं न कळे साचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जंव नाहीं देखिली पंढरी । तोंवरी वर्णिसी थोर वैकुंठींची ॥१॥ मोक्षसिद्धी तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीनरूप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जंव हंस काया नव जाय सांडोनी । तंव घेईं ठाकोनि रामनाम ॥१॥ अंत काळवेळीं तुझें नव्हे कोण्ही । मी माझें ह्मणवूनि भु-ललासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुकों नको ॥१॥ जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरीगुण गायें आइक वहिला । मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम