भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळो तैसा प्रेमरंग । जाय भुलोनि पतंग

jalo taisa premarang | jay bhuloni patang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जळो तैसा प्रेमरंग । जाय भुलोनि पतंग ॥१॥ सासूसाठी रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ध्रु.॥ मैंद मुखींचा कोंवळा। भाव अंतरीं निराळा ॥२॥ जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं नये हातीं ॥३॥ बक ध्यान धरी । दावी सोंग मस्य मारी ॥४॥ तुका म्हणे सर्प डुले । तैसा कथेमाजी खुले ॥५॥